आजकाल राजकारणात नवीन पद्धत अस्तित्वात दिसते. राजकारणात उतरायचे, नगरसेवक म्हणून निवडून यायचे, महापालिकेची विविध कामे घ्यायची, निकृष्ट दर्जाचे कामे करायची, पैसे कमवायचे, कामे निकृष्ट झालीत म्हणून स्वतःच आंदोलनात पुढे उभे राहायचे, जनतेसोबत गोड गोड बोलायचे, जनतेची फसवणूक करायची ,अशी ही राजकारणातील नवीन पद्धत असून जनतेने असे गोडबोल्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून दिली. असे प्रतिपादन आमदार अँड. राहुल ढिकले यांनी केले.
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या सत्काराचे आयोजन रविवारी ( दि. १५ ) भाजप शहर उपाध्यक्ष राजेश आढाव यांनी केले. दसक डी. पी. रोड, जेलरोड येथील बालाजी सी.एन.जी. येथे कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नाशिकरोड मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे, माजी नगरसेवक शरद मोरे, धोंडीराम सातभाई, अरुण माळवे,भगवान लोळगे, उदय शेवतेकर, संजय कीर्तने, आयोजक राजेश आढाव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक किरण पगारे, बापू सातपुते, दीपक जाधव, रामदास गांगुर्डे, विशाल पगार, गोरख देसले, सुनील शिरसागर, हर्षद आढाव, यश आढाव, गोकुळ बोराडे, सचिन शेजवळ, सोहम आढाव, मैत्रेय आढाव, अविनाश आढाव आदींनी केले. सूत्रसंचालन अशोक गवळी यांनी तर आभार दीपक जाधव मानले.प्रास्तविक राजेश आढाव यांनी केले.
आमदार अँड. ढिकले पुढे म्हणाले की, नाशिकरोड व जेलरोड परिसरातील रस्ता रुंदीकरणाची कामे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार आहे. लवकरच त्याची सुरुवात होणार असून परिसरातील रस्ते उत्तम दर्जाचे होतील,असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आमदार अँड ढिकले यांनी मतदार संघातील मतदारांनी माझ्यावर भरपूर प्रेम केले मतदान रुपी आशीर्वाद दिला त्यामुळे आज मी तुमच्यासमोर उभा आहे मी राजकारणात पैसे कमविण्यासाठी आलेलो नाही आमचा ढिकले परिवाराचा इतिहास बघा आमचे जे काही राजकारण असते ते स्पष्ट असते लपून-छपून आम्ही राजकारण करत नाही त्यामुळे भविष्यात देखील आम्ही जनतेचे हित लक्षात घेऊन राजकारण करू असे आश्वासन आमदार ढिकले यांनी दिले.
उमेदवार भ्रष्टाचारी अन् दोष ईव्हीएम मशीनला !
आमदार अँड. राहुल ढिकले यांनी ईव्हीएम मशीन विषयी बोलताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे उमेदवार निवडणूक रिंगणात विरोधकांनी उतरविले. जनतेने भ्रष्टाचारी उमेदवारांना त्यांची जागा दाखवली. भ्रष्टाचारी उमेदवार पराभूत झाल्यावर त्याचे खापर मात्र विरोधकांनी ईव्हीएम मशीनला दोष देत त्यावर फोडले. असे कसे काय होऊ शकते. म्हणजे उमेदवार भ्रष्टाचारी द्यायचा, जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली, की दोष मात्र मशीनला द्यायचा असे केविलवाणे राजकारण सध्या विरोधकांचे सुरू असल्याचे आमदार अँड. ढिकले यांनी म्हटले.
वोट जिहाद वर लाडक्या बहिणींचा कळस
आमदार अँड. राहुल ढिकले यांनी वोट जिहाद बाबतचा मुद्दा उपस्थित केला. लोकसभेमध्ये वोट जीहाद चा मुद्दा बऱ्यापैकी प्रभावी ठरला.परिणामी महाविकस आघाडीला यश मिळाले. विधानसभेला मात्र हिंदू मतदार संघटित झाले. त्यांनी एकत्रितपणे महायुतीच्या बाजूने मतदान केले. त्यावर लाडक्या बहिणींनी कळस चढविला. त्यामुळे आज महायुतीला राज्यात घावघावित अन् निर्विवाद यश मिळाले. असे अँड. ढिकले यांनी सांगितले.
विविध संघटना, मंडळाकडून सत्कार
यावेळी नितीन ठाकूर, प्रताप सरदार, रवी पगारे, संपतराव आढाव यांच्यासह रेव्हिराईस नेस्ट सोसायटी, सातभाई बिजनेस हब, गुरू बिल्डकाॅन, जेष्ठ नागरिक संघ, शिवराम नगर फाउंडेशन, शिल्प स्वामिनी सोसायटी, दशक ग्रामस्थ, अपूर्वा कॉलनी, माजी सैनिक संघ, मायलान प्रा.लि कामगार, शिल्प आकृती अपार्टमेंट आदींनी आमदार अँड.ढिकले यांचा सत्कार केला.