394 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
आमदार सरोज अहिरे यांनी आभार दौऱ्या पाठोपाठ लगेच देवळाली विधानसभा मतदार संघातील बेमोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचा पाहणी दौरा बुधवारी ( दि. ११ ) केला. याप्रसंगी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा आमदार अहिरे यांनी जाणून घेतल्या. याविषयी सरकारी दरबारात आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.
देवळाली मतदार संघातील ओढा गावासह परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या द्राक्षपीक नुकसानीची आमदार सरोज आहिरे यांनी द्राक्षबागेत जात पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याबाबत शासनाकडे आपण दाद मागू, अशी ग्वाही दिली. गेल्या आठवड्यात झालेल्या बेमोसमी पावसाने विविध शेतपिके आणि द्राक्षबागांची तलाठी प्रिया पगारे, कृषी सहाय्यक सीमा बोठे, साहेबराव पेखळे, निलेश पेखळे, रंगनाथ पेखळे यांच्यासोबत पाहणी केली. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईबाबतच्या सूचना केल्या. या पावसाने पावसाने अनेक ठिकाणी द्राक्ष बागा तसेच नगदी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आमदार सरोज आहिरे यांनी सांगितले कि, देवळाली मतदार संघात पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला या नुकसानीबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार भरपाई देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय