विहीतगाव ते पिंपळगाव खांब आणि वडनेर गाव ते वडनेरगेट, देवळालीगाव ते सौभाग्य नगर या रस्त्यांची खड्ड्यांमुळे वाट लागली होती. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. अधिकारी वर्ग याकडे कानाडोळा करीत होता. याप्रश्नी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी संबधित अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने तातडीने रस्त्यांच्या डागडूगजीला सुरुवात केली आहे. यामुळे वाहनधारक समाधान व्यक्त करतांना दिसून येते आहे.
रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतूककोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते होते. रस्त्यांच्या खडीकरण , डांबरीकरण आणि दागडूगजीला सुरुवात झाल्याने वाहनधारकांना होणारा त्रास कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. दरम्यान रस्त्यावर वाहतूक,सूचना फलक, पथ चिन्हे नसल्याने रात्री वाहनचालकांचा गोंधळ होत असून या मार्गावर साईडपट्ट्या तसेच दुभाजक नाहीत. नगरी वस्ती भागात गतीरोधक नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. लवकरच या समस्यांचे निराकरण केले जाणार असल्याचे माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मोबदला द्यावा
विहीतगाव ते वडनेर दुमाला आणि पिंपळगाव खांब रस्त्याच्या डागडूगजीला सुरुवात केली. त्यामुळे वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळेल. याप्रश्नी कायमस्वरूपी उपाय हवा असेल तर रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला अगोदर द्यावा,अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी केली.