494 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली कॅम्प शहरातील विविध भागांत नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांच्या मार्गदरशनाखालील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.
देवळाली कॅम्पसह शिंगवेबहुला, चारणवाडी (पाषाणनगर), बार्ल्स स्कूल रोड, बार्ल्स स्कूल, लॅम रोड येथील बालगृह रोड, महालक्ष्मी रोड, साकूरकर चाळ परिसर, जुनी स्टेशनवाडी, नवीन स्टेशनवाडी, रेणुकानगर, लुम्बिनी नगर, विजयनगर परिसरातील गजानन महाराज मंदिर परिसर, साईबाबा मंदिर परिसरात अनियमित तसेच मुबलक पाणी येत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याने याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे,तालुकाध्यक्ष नितीन काळे, सचिन गोडसे, बंटी चौधरी, नवनाथ झोंबाड आदी उपस्थित होते.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय