492 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत असे कळते. त्याऐवजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाऊ शकते.विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे रिमोट कंट्रोल राहील, अशी चर्चा जोरात सुरू आहे. यात सत्यता कितपत हे निश्चित नसले तरी भुसे यांच्या नावाची चर्चा मात्र अगदी जोमात सुरू असल्याचे दिसते.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक जागा मिळाल्या. भाजपनेच भाजपचे रेकॉर्ड मोडीस काढले. असे चित्र दिसते. महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा असल्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रभागी आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, अडीच वर्ष मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपद दिले. मुख्यमंत्री पदावर असताना यशस्वीपणे काम केले. लाडकी बहीण योजना तर राजकारणातील मोठा टर्निंग पॉईंट असल्याचे स्पष्ट झाले. शिंदे मुख्यमंत्री पदावर असताना रात्रंदिवस सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी काम केले. मुख्यमंत्री पदाचा कुठलाही अविर्भाव मनात न बाळगता त्यांनी सामान्य जनतेत राहून काम करण्यास पसंती दिली. अल्पावधीतच महाराष्ट्रातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी एक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख निर्माण झाली. त्याचाच लाभ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बऱ्यापैकी मिळाला. त्यामुळे शिवसेनेच्या जागा भाजप पेक्षा कमी असतानाही मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा शिंदे यांना मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु भाजप तर्फे फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागेल असे दिसते.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एक सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय