413 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक महापालिका निवडणुकीत महायुतीने एकत्रित लढायचे की शिवसेनेने स्वतंत्र निवडणुक लढवावी, याबाबत प्रभागवर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जाईल. त्याचप्रमाणे याविषयी वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.
राज्याची विधानसभा निवडणूक महायुतीने एकत्रित लढवली. यामध्ये घवघवीत यश मिळाले.त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीने एकत्रित लढवायच्या की शिवसेनेने स्वतंत्रपणे लढवायची, याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा केली जात आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर लवकरच या संदर्भात आम्ही बैठक घेणार आहोत. बैठकीत निवडणुकीची रूपरेषा ठरवली जाईल, शहरातील प्रत्येक प्रभागातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल.त्यांचे काय मत आहे, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या अडचणी व समस्या याविषयी त्यांची मते जाणून घेणार आहोत, सर्वांच्या सर्वानुमते जो काही निर्णय होईल तो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कळविला जाईल.त्यानंतर नाशिक शहरांमध्ये शिवसेनेने स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढवायची की महायुतीमध्ये एकत्रित निवडणूक लढवायची, याबाबत निर्णय होईल, असे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी स्पष्ट केले.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय