769 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा निवडणूकीत विद्यमान आमदार सरोज आहिरे यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. निवडणूक प्रचारा दरम्यान एकमेकांवर जाहीर आरोप प्रत्यारोप झाले. मतदार संघातील सर्वच उमेदवारांच्या समर्थकांनी सोशल मिडीयात वादग्रस्त पोस्ट टाकून वातावरण अधिक पेटते ठेवण्यास हातभार लावला. यादरम्यान उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर थेट आरोप करण्यास टाळले. निकाला नंतर देखील सूंपर्ण मतदार संघात शांततेचे वातावरण आहे. नवनिर्वाचित आमदार सरोज आहिरे यांनी त्यांच्या व्हाटस अप स्टेटस वर एक पोस्ट शेअर केली. पोस्ट बोलकी आहे. मतदार संघात पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
किचड उनके पास था …, मेरे पास गुलाल. जो भी जिसके पास था …, उसने दिया उछाल. अशा स्वरुपाची पोस्ट आमदार आहिरे यांनी शेअर केली. शेअर केलेल्या पोस्ट मधील अर्थ बोलका आहे. चार वाक्यात खुप काही अर्थ बोध होतो. किचड उनके पास था, म्हणजे आमदार आहिरे यांना निवडणूक दरम्यान हिरकणी, विकास कन्या, आणि शरद पवार यांच्या मानसकन्या यासारख्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या उपाधी वरुन विरोधकांनी उपहासात्मक टिका आणि आरोप केले. सोशल मिडीयावर अश्या पोस्ट निदर्शनास दिसून येत होत्या. तर देवळाली कॅम्प येथे हिरकणी या उपाधी वरुन विरोधकांनी जाहीर होर्डिंग उभारले होते. थोडक्यात विरोधकांनी आहिरे यांना घेरण्याचा प्रयन्त केला.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय