17.7 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

नाशिकरोड मालधक्का येथे संविधान दिनानिमित्ताने मिठाई वाटप ; रामबाबा पठारे आणि भरत निकम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

412 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सहकाऱ्यांनी तयार केलेल्या भारतीय संविधानास २६ नोव्हेंबर रोजी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल नाशिकरोड येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मिठाई वाटपाचा कार्यक्रम झाला.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियन रेल्वे यांच्या तर्फे रेल्वे मालधक्का येथे मंगळवारी ( दि. २६ ) रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात व प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला. उपस्थित कामगार बांधवांना मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कामगार नेते रामबाबा पठारे, कामगार नेते भारतजी निकम,गुल्लूशेठजी आनंद, शिवणारायणशेठ सोमणी,राजू भाऊ मोकळ,दिपकभाऊ वाघ,प्रभाकरजी रोकडे,सुभाष अहिरे,रवी जगताप,लखन गवळे,नाना चंद्रमोरे,सागर शार्दुल,रंजीत पठारे,सुनील चंद्रमोरे,कैलास भालेराव, विजय अहिरे,संदीप वाघचोरे, राहुल भालेराव, विशाल अहिरे,सम्राट गायकवाड, जयराम जाधव मधू मोकळ आदीसह शेकडो कामगार उपस्थित होते.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय 

विविध उपक्रमांचे आयोजन

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियन तर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्र पुरुषांचा जयंती उत्सव, सामाजिक उपक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामुळे सर्व कामगार एकजुटीने आणि एका कुटुंबाप्रमाणे वास्तव्य करताना दिसतात. येथील युनियनचे संघटन कौशल्य देखील उत्तम प्रकारे असते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles