481 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघात आमदार सरोज अहिरे दुसऱ्यांदा प्रचंड मतांनी निवडून आल्या. त्यांच्या यशामध्ये त्यांच्या विकास कामांचा सिहांचा वाटा आहे. पाच वर्षात केलेली विकास कामे हीच त्यांची मोठी जमेची बाजू ठरली. विकास कन्या, हिरकणी अशी विशेषणे त्यांच्या नावासोबत जोडली गेली. दुसरीकडे विरोधकांनी या विशेषणावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप झाले. अहिरे यांना एकटे पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला.पण यादरम्यान त्यांना खंबीरपणे काही निवडक आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतपत कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम कोठुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे.संपूर्ण प्रचारादरम्यान कोठुळे यांनी अहिरे यांचे बॅक ऑफिस सांभाळत त्यांना मदत केली.कोठुळे यांच्यासारख्या काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले. पक्षाकडून त्याची दखल घेऊन त्यांना प्रेरणा देणे आवश्यक आहे.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक पेठ मंगल कार्यालय

प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा
निवडणूक एका दिवसाची असते. मात्र त्याची पूर्व तयारी, प्रचार यंत्रणा, प्रचार दौरा, त्याचे नियोजन,कार्यकर्त्यांवर जबादारी सोपविणे, पक्षाच्या प्रमुख नेत्यांची सभा,बैठका, विविध विभागांच्या परवानग्या आदी एक ना अनेक कामे कार्यकर्त्यांवर सोपवावी लागते. त्यासाठी जवळचे एकनिष्ठ आणि विश्वासपात्र कार्यकर्ते सोबत असायला हवे. आमदार सरोज अहिरे यांच्या निवडणुकीची पूर्वतयारी आणि नियोजन बऱ्यापैकी विक्रम कोठुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. त्यासाठी त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली. पण विक्रम कोठुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवटपर्यंत अतिशय संयमाने आमदार सरोज अहिरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत करीत आपली निष्ठा सिद्ध करून दाखवली.
राजकारणात वेगात घोडदौड
राजकारणात अहिरे यांची घोडदौड वेगात दिसते. सामान्य जनतेच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यात अहिरे शंभर टक्के यशस्वी झालेल्या आहेत. त्यामुळे विकास कन्या विशेषण त्यांना लागू होते. पण अहिरे यांच्या पासून आजवर पक्षाचे अनेक कार्यकर्ते दुरावत गेले. आणि तितक्याच दुपटीने जवळ देखील आले. ही देखील वस्तुस्थिती आहे. ती नाकारून चालणार नाही. दुरावत गेलेल्या कार्यकर्त्यांची नावे घेणे उचित ठरणार नाही. पण शेवटी राजकारणात कार्यकर्ते,त्यांची मदत व भूमिका महत्त्वाची ठरत असते. याविषयी विचारमंथन व्हायला हवे.
