2,168 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार ॲड. राहुल ढिकले आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सरोज अहिरे यांची नावे मंत्रिपदासाठी घेतली जात आहे. मंत्रिमंडळ शपथविधी दरम्यान ढिकले आणि अहिरे यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दोघांच्याही समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान आमदार देवयानी फरांदे आणि आमदार नरहरी झिरवळ यांची नावे मंत्री पदाच्या शर्यतीतून मागे पडल्याची चर्चा आहे.
विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमधून आमदार ॲड.राहुल ढिकले यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला. सुमारे ८७ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने ढिकले यांनी विजय मिळविला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीत त्यांचे नाव संभाव्य मंत्री म्हणून घेतले जाते आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार ढिकले यांचे नजीकचे संबंध आहे. शिवाय गिरीश महाजन यांच्या सोबत देखील ढिकले यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे तरुण नेतृत्व म्हणून आमदार ढिकले यांच्याकडे पाहिले जाते.त्यांना राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील स्व. उत्तमराव ढिकले खासदार, आमदार होते. नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदी महत्वाचे पदे स्व. उत्तमराव ढिकले यांनी भूषविले होते. त्यांचे बंधु डॉ. सुनील ढिकले नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आहेत. थोडक्यात त्यांना राजकीय वारसा आहे. त्यामुळे त्यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहे.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय