850 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
मराठा सोयरीक संस्थेचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळे संस्थेच्या मेळाव्याला एवढी अभुतपूर्व गर्दी जमली. असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
अखंड मराठा समाज आणि मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक रोड ( दि. ३० ) कदम लॉन्स येथे मराठा वधू वर परिचय मेळावा पार पडला. त्यावेळी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे बोलत होते.नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते अशोक कुटे यांच्या मराठा सोयारिक संस्थेसारख्या संस्था आहेत. म्हणून समाजातील अनेक मुला मुलींचे विवाह जमत आहेत. आजकाल कोणालाही लग्न जमवण्यासाठी वेळ नसल्यामुळे नसल्यामुळे अशा संस्थांची गरज असल्याचे अरिंगळे यांनी सांगितले.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवन ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय

मेळाव्यास मराठा सोयरिक संस्थेचे संस्थापक अशोक कुटे,महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास (बंटी ) भागवत, विठ्ठल प्रसाद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय गायधनी, फकीरराव कदम, शिवाजी हांडोरे, किशोर जाचक, डी.जी. पाटील, शंकरराव सोमवंशी, नितिन चिडे शरद जगताप, रामनाथ मालुंजकर, धनंजय घोरपडे, अतुल घोंगडे, नितीन खोले, रामभाऊ जगताप छायाताई झाडे, अश्विनी महाले,कमलेश कोते, योगेश नाटकर इत्यादी अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान पुढील मेळावा जानेवारी महिन्यात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या थोरात सभागृहात व त्यानंतरचा नवी मुंबई येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ज्यांना नाशिक मेळाव्यास यायला जमले नाही, त्यांनी अधिक माहितीसाठी 7020281282 या नंबर वर संपर्क करावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मेळाव्यासाठी चार हजार पालकांची उपस्थिती होती. एकूण न ७८० नावांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ६३० मुले व १५० मुलींची नाव नोंदणी झाली. मेळाव्यातून किमान ३० विवाह होईल, असे बंटी भागवत व डॉ. संजय गायधनी यांनी म्हटले. आजवरच्या पार पडलेल्या मेळाव्यापैकी नाशिकरोडचा मेळावा सर्वात मोठा झाला. असे अध्यक्ष अशोक कुटे यांनी सांगितले. वेगवेगळ्या जिल्ह्यातून वधु वर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुला, मुलींनी व्यासपीठावर येऊन स्वतःचा परिचय दिला.
वधु वर मेळाव्यासाठी संपर्क
मराठा समाजातील वधू वर मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पालकांनी विकास (बंटी) भागवत 9881615511 संयोजक मराठा वधू वर मेळावा तसेच
अध्यक्ष महाराष्ट्र माझा परिवार यांच्या सोबत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
