525 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी आमदार योगेश घोलप यांनी यापूर्वी देवळाली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळात मतदार संघाला अगदी कमी निधी मिळत होता. त्यामुळे विकास कामे करताना मर्यादा पडत होत्या. आजच्या घडीला तसे नाही विद्यमान आमदारांना अधिक निधी मिळाला. त्यामुळे विकास कामे त्यांनी केली. परंतु त्यांनी केलेली विकास कामे अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत. तर घोलप कुटुंबीयांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे आजही शाबूत आहे. असा दावा पळसे येथील संतोष गायधनी यांनी केला.
गायधनी म्हणाले की,पूर्वी वार्षिक ५० लाख रुपये निधीत ८६ गावांची कामे मार्गी लावणे अत्यंत अवघड होते. १ जुलै २०१७ रोजी GST लागू झाला. त्यानंतर सरकारी तिजोरी मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध होऊ लागला. दरम्यान सरकारी कामांचे निधीत वाढ झाली. रस्ते,पाणी आदी विकास कामांना मंजुरी मिळाली. शासनाकडून भरघोस प्रमाणात निधी मिळत गेला त्यामुळे देवळाली नव्हे महाराष्ट्रातील सर्वच आमदारांना विकास मतदारसंघात विकास कामे करण्याची संधी मिळाली परंतु देवळालीतील विकास काम यांची अवस्था बघितली तर अतिशय निकृष्ट दर्जाचे विकास कामे केली आहे. १३०० कोटी रुपये निधी विद्यमान आमदारांना दिला. त्यांनी केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. प्रत्येक काँक्रीट रस्ता १५ वर्षे टिकायला हवा.तो वर्षभरात फुटू लागला,कमी ग्रेडचे सिमेंट प्रत्येक सिमेंट रस्त्याला वापरण्यात आले आहे. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी हे तपासून बघितल्यास सत्य नक्की समोर येईल,असे संतोष गायधनी यांनी सांगितले.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय