22.6 C
Nashik
Friday, July 4, 2025
spot_img

हिंदूंनो संघटित व्हा!; स्वतःचे आत्मपरीक्षण करा!; अभिनेते राहुल सोलापूरकर

375 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

हिंदू धर्म सर्व दिशांनी धोक्यात सापडला असूनही आपण आपल्याला एवढे सहिष्णू म्हणवून का मिरवत आहोत, आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो,पण हिंदू धर्मासाठी आपण एक होतो का ?, आपल्याला स्वतःचे आत्मपरीक्षण करण्यास गरज आहेत. लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड आणि व्होट जिहाद या देशापुढील सर्वांत मोठ्या समस्या आहे. या समस्यांची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्याला अजूनही समजत नाही हे दुर्दैव आहे. असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

नाशिक रोडच्या पुरूषोत्तम इंग्लीश स्कूलमधील धामणकर सभागृहात शुक्रवारी अश्वमेधप्रबोधिनीतर्फे सजग रहो या अभियान अंतर्गत एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र या विषयावर व्याख्यान पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष मारुती कुलकर्णी, अश्‍वमेघ प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश आढाव, सचिव ज्ञानेश्‍वर भोर, उपाध्यक्ष रविंद्र शिंदे, संजय किर्तने, माजी प्राचार्य उदय शेवतेकर, योगेश भगत,रावसाहेब गायधनी आदी उपस्थित होते. राहुल सोलापूरकर पुढे म्हणालेकी जम्मू काश्मीर राज्यातील केंद्रीय विद्यालयात बारावी पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा २०१४ नंतर प्रथमच उपलब्ध झाली. त्यामुळे दहशतवादाचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेल्याने या राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांत मतदानाची टक्केवारी वाढली. शहीद आणि हुतात्मा यातील अर्थ भेद सर्वात प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्पष्ट केला. देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सूचनेवरून वक्फ बोर्ड निर्माण झाले. आज देशात संरक्षण विभाग आणि रेल्वे यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची आरक्षित जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे.एकट्या महाराष्ट्रात १ लाख १७ एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. त्यापैकी राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. १९७५ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा कायदा आणून वक्फ बोर्डाला अधिक स्वायत्तता दिली आहे. हिंदू धर्माच्या सर्व देव देवतांच्या हातात शस्त्र दिसतात अन् आपण मात्र सहिष्णू म्हणवून घेतो या विसंगतीवर त्यांनी बोट ठेवले.

नांदूर मानूर परिसरात  विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

प्रास्ताविक राजेश आढाव यांनी केले. सुत्रसंचलन ज्ञानेश्‍वर भोर यांनी केले. आभार प्रदर्शन विलास आढाव यांनी केले. संयोजन अश्‍वमेघ प्रबोधिनीचे विलास वारुंगसे, नामदेव आढाव, माधव चौधरी, गोकूळ घोलप, केशव पहाडे, निवेश आहिरराव, सुभाष शिंदे, प्रदिप वाघ यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles