944 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात आडगाव शुभसंकेत ठरले. प्रथम या गावाने मला प्रचंड मताधिक्य देऊन विधानसभेत पाठविण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला. यानंतर सर्वच ठिकाणी एकमुखी पाठिंबा मिळत गेला. त्यामुळे खऱ्या अर्थाने माझ्या विजयरथाची सुरुवात आडगाव मधूनच होईल,असा आत्मविश्वास महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांनी व्यक्त केला आहे.
शनिवारी ( दि.१६ ) सकाळी आडगाव येथे चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार अँड राहुल ढिकले बोलत होते. आमदार राहुल ढिकले पुढे म्हणाले की आडगाव हे पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. बदलत्या काळानुसार आडगावने आपली विचारसरणी बदलली. गावाचे अजून एक वैशिष्ट्य आहे.त्यांनी एकदा एखादा निर्णय घेतला की, तो ठामपणे अमलात आणतात. त्यासाठी कुणाचाही दबाव वगैरे ते पाळत नाही. एकदा शब्द दिला की तो मागे फिरवत नाही, त्यामुळे मला प्रचंड आत्मविश्वास निवडणुकीमध्ये निर्माण झाला आहे. आडगाव माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे, त्याचा सार्थ अभिमान महायुतीला आणि मला आहे. आडगावकरांनी दाखवलेल्या एकमुखी पाठिंब्यामुळे मला निवडणूक प्रचारात प्रचंड दिलासा मिळाला. आणि नवीन चेतना मिळाली. आडगाव बद्दल असलेल्या अभिमानाला कधीही तडा जाऊ देणार नाही. असा मी आज तुम्हाला शब्द देतो. आज चौक सभा होती. पण चौक सभेचे रूपांतर या प्रचंड जनसमुदायात झाले. त्यामुळे माझ्या विजयाचा रथ हा आडगाव मधूनच निघेल, असा ठाम आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला आहे.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय