432 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार सरोज अहिरे यांचा सध्या भगूर, देवळाली कॅम्प व परिसरात प्रचार दौरा सुरू आहे. प्रचारादरम्यान आमदार अहिरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मतदार सलग दुसऱ्यांदा आमदार अहिरे यांना राज्याच्या विधानसभेत देवळालीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवतील, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जातो आहे.
यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यात आली. येऊन येऊन येणार कोण, सरोजताई शिवाय आहेच कोण, एकच कन्या विकासकन्या, महायुतीचा विजय असो आदी विविध घोषणा देण्यात आल्या. आमदार सरोज आहिरे यांचा मतदारसंघात प्रचाराचा झंझावत सुरु आहे. देवळाली विधानसभा निवडणुकीसाठी देवळाली मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविणारे अजित पवार गटाच्या उमेदवार आहिरे यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या विजयासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे.
देवळालीचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर पुन्हा सरोजताई आहिरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन ठीकठिकाणी कार्यकर्ते करताना दिसत आहे.दरम्यान शुक्रवारी जातेगांव अवधुत, दहेगांव,, विजय नगरगांव, विजय नगर अवधुत, भगूर रिक्षा स्टॅड, जातेगांव, देवळाली कॅन्टोमेंट बोर्ड, गुरुद्वारा कॅम्प, विहीतगांव आदी परिसरात रॅली काढून महायुतीला घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
नांदूर मानुर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय