236 Post Views
अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांचे प्रतिपादन
देशात राजकीय क्षेत्रातील नितिमूल्ये अन नैतिकतेचा ऱ्हास होतो आहे. आमच्या सोबत येणार असेल तर सत्तेत वाटा दिला जातो, अन विरोधात जाल तर जेलमध्ये जावे लागेल असे चित्र देशात दिसून येत आहे. देशात लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना निवडून देऊन इंडिया आघाडीचे हात बळकट करावे, असे प्रतिपादन अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
जेलरोड येथील इंदिरा गांधी चौकात सोमवारी ( दि.१३ ) सायंकाळी नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीन बानगुडे पाटील बोलत होते. पेट्रोल, गॅसचे वाढते दर, शेतकऱ्यांच्या मालावर टॅक्स लावणे, चुकीचे आयात निर्यात धोरण, सोयाबीन तेल, दुधाची पावडर आयात केली, कांद्याच्या निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादन शेतकरी देशोधडीला लागला आहे. केंद्र शासनाचे धोरण शेतकरी, कामगार धोरण अत्यंत चुकीचे आहे.बेरोजगारी वाढते आहे, जगात सर्वात अधिक तरुणांचा देश म्हणुन भारताकडे पाहिले जाते.
मात्र येथे आवश्यक त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नाही. ही शोकांतिका आहे. बेरोजगार तरुणांच्या मनात प्रचंड उद्रेक आहे. शेती, उद्योग आणि सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेला महाराष्ट्र आज पिछाडीवर आहे. विविध प्रकारचे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये पळविले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत आपण इंडिया आघाडीला मतदान करून भाजपचा पराभव करावा, असे आवाहन नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
याप्रसंगी दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, वसंत गीते,केशव पोरजे, सचिन पिंगळे,गजानन शेलार,शैलेश ढगे, सुनील बोराडे,रोशन आढाव, प्रशांत दिवे, मंगलाताई आढाव, रंजना बोराडे, योगेश गाडेकर,सागर भोजने,योगेश नागरे ,अतुल धोंगडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप आढाव यांनी केले. आभार सुनील बोराडे यांनी मानले.
संधी मिळाल्यास नाशिक मधून कारभार : राजाभाऊ वाजे
सद्याचे राजकीय वातावरण अन मिळणारा प्रतिसाद पाहुन विजय निश्चित आहे. खासदार झाल्यावर आपण नाशिक शहरातून कारभार करणार आहोत, विभागवार संपर्क कार्यालयाची स्थापना केली जाईल, तेथूनच जनतेच्या समस्या, अडचणी सोडविण्यात येईल.