भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम ( दि.८ ) मे रोजी जाहीर केला होता.त्यानुसार ( दि.१० ) जुन रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाला प्राप्त झालेल्या निवेदनानुसार निवडणूक आयोगाने 10 जुन रोजी होणाऱ्या मतदानाची तारीख रद्द केली आहे.
शाळा ,महाविद्यालयांची सुट्टी संपल्यानंतर या निवडणुका घेणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे प्रचारात व्यस्त असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा यामुळे हिरमोड होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक 10 जून रोजी होणार होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता ही निवडणूक पुढे ढकललेली आहे.
त्यामुळे आता सर्व इच्छुकांचे लक्ष निवडणूक आयोग पुन्हा नवीन तारीख केव्हा जाहीर करतो याकडे आहे . नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये संदीप गुळवे हे इच्छुक होते.मागील काही दिवसांपासून त्यांनी जोरदारपणे निवडणूक पुर्व तयारी देखील केली होती. निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास यांची स्वाक्षरीचे पत्र प्रसिद्धी माध्यमांना पाठविण्यात आले असून पत्रात निवडणूक रद्द झाल्याचे काळविले आहे.