नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या बालेकिल्ल्यात प्रचार केला. गोडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या देवळाली कॅम्प, भगूर ,लॅम रोड आदी भागात हा प्रचार करण्यात आला. वाजे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सौभाग्य नगर, विहितगाव,वडनेर गाव,वडनेर गेट,पिंपळगाव खांब, दाढेगाव आदी भागातील मतदारांना प्रत्यक्ष भेटून राजाभाऊ वाजे यांनी आपल्याला मतदान करावे, असे साकडे मतदारांना घातले, मतदारांचा देखील वाजे यांना प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत होते.
ठीक ठिकाणी वाजे यांचे महिलांनी औक्षण केले. मतदारांनी संधी दिली तर आपण शेतकऱ्यांचे कामगारांचे तसेच कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, त्याचप्रमाणे उद्योग, व्यवसाय,बेरोजगारी या समस्येकडे लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सतत सामान्य जनतेच्या संपर्कात असल्यामुळे जनतेच्या समस्यांची माहिती आहे. राजाभाऊ वाजे आणि मतदार यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर संवाद झाला.