नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राहुल ढिकले यांचा बुधवारी ( दि. ६ ) जेलरोड परिसरात प्रचार करण्यात आला. प्रचारात परिसरातील स्थानिक नागरिकांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सचिन हांडगे,माजी नगरसेवक शरद मोरे, अरुण माळवे,कृष्णा बोराडे, राहुल गायकवाड, दादू ढिकले, विजय खैरनार, अमोल बोराडे, दिनेश नाचन, कांगणे काका आदींसह कार्यकर्ते प्रचार रॅलीत उपस्थित होते.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज एसी बँक्वेट संजीवनी लॉन्स
जेलरोड परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व कॉलनी व परिसरात प्रचार करण्यात आला. दरम्यान विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी जेलरोड परिसरात सभागृह, सभामंडप, अभ्यासिका आदी विविध विकास कामे केली आहेत. तसेच सामान्य नागरिकांच्या मदतीला आणि अडचणी सोडवायला धावून जाणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. २०१९ प्रमाणे २०२४ च्या निवडणुकीत देखील आमदार राहुल ढिकले यांना मतदार मोठ्या संख्येने विजय करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.