नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांच्या नाशिकरोड येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी ( दि.६ ) खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिक – पुणे रस्त्यावरील दत्त मंदिर चौकात असलेल्या सद्गुरु हॉटेल लगत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्यासह दत्ता गायकवाड, गजानन शेलार,कोंडाजी मामा आव्हाड, आकाश छाजेड, शरद अहिरे, कामगार नेते जगदीश गोडसे,सुनील बागुल, विलास शिंदे, नितीन भोसले आदी होते. याप्रसंगी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अशोक पाटील, सचिन आहेर,मुन्ना अन्सारी, अशोक पेखळे,समाधान कोठुळे,संतोष गाडेकर,भारत पुजारी,किरण लोखंडे, कामिन शेख,ज्ञानेश्वर गायकवाड आदी होते.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी सुसज्ज संजीवनी एसी बँकेट लॉन्स
सूत्रसंचालन व आभार अशोक सातभाई यांनी केले. खासदार शोभा बच्छाव म्हणाल्या की, राज्यात ईडीच्या नावाखाली अनेक लोकांना तुरुंगात टाकले जाते, जो विरोधात जाईल त्याचा चळ केला जातो. राजकीय दादागिरी, दहशत निर्माण केली जाते. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कामगार विरोधी महायुतीचे सरकार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील मतदारांनी परिवर्तन करावे. गणेश गीते महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांना मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी बच्छाव यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांनी सांगितले की, मतदारांनी मला संधी द्यावी, त्या संधीचे निश्चितपणे सोने करीन असे म्हटले.