670 Post Views
नाशिकरोड, प्रतिनिधी
महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक उध्दव निमसे यांना भारतीय जनता पक्षाने नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी, अशी असंख्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. मागणी मान्य न झाल्यास भाजपला सोडचिठ्ठी देऊन आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागेल, असा इशारा निमसे यांचे समर्थक तथा नांदूर – मानुर सोसायटीचे माजी चेअरमन संतोष माळोदे यांनी दिला.
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढविण्यासाठी उद्धव निमसे इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करायला हवा,उद्धव निमसे मागील अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क असून मतदारसंघात त्यांचे नात्यागोत्यांचे जाळे मतदार संघात आहे. त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचे समर्थक निमसे यांना निश्चितपणे निवडून आणून दाखवतील,असा दावा माळोदे यांनी व्यक्त केला आहे.उद्धव निमसे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही तर समर्थकांकडून निमसे यांनी वेगळा मार्ग निवडावा, अशी आग्रही भूमिका त्यांच्या समर्थकांची आहे. त्यानंतर निमसे यांनी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवली तरी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून निमसे यांना निवडून आणून दाखवू, असा आत्मविश्वास संतोष माळोदे यांनी व्यक्त केला आहे.
कोण आहेत संतोष माळोदे
माळोदे मागील अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत काम करतात, विशेष म्हणजे उद्धव निमसे यांचे कट्टर समर्थक आहे. आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना, मराठा आरक्षण आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. उद्धव निमसे यांचे व्यक्तिनिष्ठ अशी त्यांची ओळख आहे.