देवळाली कॅम्प प्रतिनिधी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेचे माजी अध्यक्ष कर्मयोगी दुलाजीनाना पाटील यांचे कार्य सर्व सेवकांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सर्वांनी वाटचाल करावी,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस.एस. काळे यांनी केले.
जत्रा हॉटेल शिवारात स्वप्नातील घरांसाठी विश्वास पात्र समृद्धी बिल्डकॉन
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात कर्मयोगी दुलाजीनाना पाटील व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने तसेच लोककवी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एस.काळे बोलत होते. यावेळी सर्व महानुभावांना आदरांजली अर्पित केली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे यांनी लोककवी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक व कर्मयोगी दुलाजी नाना पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक विद्यार्थी उपस्थित होते.