महाराष्ट्र पाणी पुरवठा व जल :निसारण मंडळ जलसेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन व पतसंस्थाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी सभासदांना साडेआठ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
जेलरोड वरील कन्या शाळे शेजारील सिटी सेंटर येथील नवीन दालनात महाराष्ट्र पाणी पुरवठा व जल:निसारण मंडळ जलसेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित च्या उदघाटन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. सिताराम घंटे यांच्या पत्नी श्रीमती सिंधूबाई घंटे, कै दिलीप पाटील यांच्या पत्नी मंगल पाटील तर सेवानिवृत्त सुरेश चावरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
जत्रा हॉटेल शिवारातील स्वप्नातील घरांसाठी एकमेव विश्वासपात्र समृद्धी बिल्डकॉम
त्यानंतर पतसंस्थेचे सभापती मिलिंद हिरे यांच्या अध्यक्षते खाली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.यावेळी व्यासपीठावर सदस्य डी.आर घाडगे,जे. एस. घंटे,के.व्ही निकाळजे,एस. आर. शिंदे,बी.जे. पाटील,बी.टी जाधव,एस. जे. गायधनी,आर.बी.कुटे,व्ही.ए.पाटील, उषा घंटे, श्रीमती एस.जी. भालेराव,तज्ञ संचालक जे. आर जगताप,व्ही.बी.हिरे, मुख्यकार्यकरी अधिकारी डी.बी जाधव व ऑफिस स्टाफ सचिव अविनाश केसरे आदि उपस्थिती होते. सभेत सभापती हिरे यांनी प्रास्तविक करताना सांगितले कि, जानेवारी 1988साली सुरु झालेल्या पतसंस्थेनी गरुडझेप घेतली असून मार्च 2024अखेर भांडवल 22कोटी 31लाख 9हजार 771 रुपये असून मार्च अखेर पतसंस्थेस 23लाख, 45हजार 658 रुपये नफा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात सभासदांना साडेआठ टक्के लाभांश जाहीर करण्यात आले.यावेळी सभासद यांनी काही प्रश्न उपस्थित केले त्यास सभापती मिलिंद हिरे व स्टाफ सचिव अविनाश केसरे यांनी समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे सभासद यांचे समाधान झाले. सर्वसाधारण सभेत आभार सदस्य जनार्धन घंटे यांनी व्यक्त केले.