इगतपुरी: प्रतिनिधी
तालुक्यातील कावनई येथील कपिलधारा रिसॉर्ट येथे इगतपुरी तालुका समाज विकास फाउंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दि ११ जुन रोजी पार पडली.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रारंभी संचालक योगेश जाधव यांचे वडील कै भास्करराव जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर फाऊंडेशनच्या माध्यमातून या पुर्वी झालेल काम व आगामी काळातले धोरण या बाबत संचालकांची मते जाणून घेण्यात आली.
मराठा समाजाच्या शालेय तसेच माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर राबविणे, दहावी ,बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,संस्थेसाठी प्रायोगिक तत्त्वावर गोंदे दुमाला येथील कार्यालय सुरू करणे,समाजातील उपेक्षित घटकाच्या विविध अडीअडचणी सोडविणे,संस्थेकडे जमा असलेली व यापुढील काळात येणारी देणगी यांसह सामुदायिक विवाह सोहळा आयोजन,रक्तदान शिबिर,शेती विषयक तज्ञ मार्गदर्शन,महिला सन्मान,कला,क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य आदी धोरणांचा आढावा घेवून विविध विषयांचे ठराव पारित करण्यात आले. कावनई येथील प्रसिद्ध वकील आणि संस्थेचे संचालक अड कैलास शिरसाठ यांच्या कापिलधारा रिसॉर्ट च्या मोकळ्या पटांगणात ही बैठक संपन्न झाली. यावेळी संस्थेचे आणि घोटी बाजार समितीचे संचालक दिलीप चौधरी यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून त्यांना शुभकामना देण्यात आल्या.