1,137 Post Views
नाशिक : नाशिक तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या शिंदे गाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी ( दि. १४) रोजी होणार आहे. शिंदे गावचे मंडळ अधिकारी यांच्या मार्गर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. जेष्ठ सदस्य बाजीराव जाधव, तानाजी जाधव आणि अर्चना जाधव यांची नावे सरपंच पदासाठी चर्चेत आहे. यापैकी बाजीराव जाधव यांचे नाव आघाडीवर असून त्यांची निवड अंतिम मानली जाते आहे. दरम्यान या निवडणूकीत माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक प्रक्रिया संदर्भात शिंदे गाव मंडळ अधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेली आहे. शुक्रवारी ( दि. १४ ) रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. याविषयी ग्रामपंचायत सदस्य जाधव नितिन शिवाजी , मते रीना प्रकाश, जाधव ज्ञानेश्वर दादा, तुंगार सुप्रिया किरण, जाधव हिराबाई विश्वनाथ, जाधव बाजीराव सुरेश, साळवे आश्विनी किरण,जाधव वंदना भाऊसाहेब,जाधव गणपत तुळशिराम,जाधव तानाजी गंगाधर, तुंगार शालिनी चंद्रभान, धुळे भाऊराव रामभाऊ ,जाधव गोरक्ष रामचंद्र, जाधव अर्चना संदीप, बोराडे अशोक शिवाजी, तुंगार अनिता संजय, बोराडे संगिता तानाजी आदी. सदस्यांच्या नावाने नोटीस काढण्यात आलेली आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
सरपंच निवडणुकीची पार्श्वभूमी अशी
सत्ताधारी गटात फुट पाडल्याने सरपंच गोरख जाधव यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला, मार्च महिन्यात ठराव मंजुर झाला. त्यामुळे सरपंच पद रिक्त आहे. गोरख जाधव हे अविश्वास ठरावाच्या विरोधात अपिलात गेले.पण बाजूने निकाल लागला नाही, त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.