नाशिकचे खासदार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्या कामकाजाचा अनुभव बघितला तर ते तिसऱ्यांदा निवडून येऊन नाशिक लोकसभा मतदारसंघात हैट्रिक साधतील, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते संतोष पिल्ले यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात यापूर्वी हेमंत गोडसे यांनी दोन वेळेला विजय संपादित केला आहे.प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्यांनी लाखोच्या मताने पराभूत केले आहे. सतत दोन निवडणुकित विजय झाल्यामुळे हेमंत गोडसे यांना कामकाजाचा उत्तम अनुभव आहे.त्याचप्रमाणे दिल्ली येथे जाऊन मतदार संघात कामे कशाप्रकारे मंजूर करावेत, याविषयाचा हातखंडा हेमंत गोडसे यांच्याकडे आहे. मागील दहा वर्षांमध्ये हेमंत गोडसे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील नागरिक यांच्यामध्ये गोडसे यांनी कधीही दुरावा निर्माण होऊ दिला नाही, ते कायम जनतेच्या सुख दुःखाला धावून जात असतात. लहान मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. त्याचप्रमाणे नाशिक लोकसभा मतदारसंघात मागील अनेक वर्षापासून रखडलेले प्रकल्प, कामे आणि योजना मार्गी लावण्यासाठी हेमंत गोडसे यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला रेंगळलेली कामे पूर्ण झाल्याचे दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांचा मतदारांसोबत कायम सुसंवाद असल्यामुळे ते तिसऱ्यांदा निवडून येऊन एक नवीन इतिहास घडवतील, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा संतोष पिल्ले यांनी व्यक्त केला आहे.