नाशिक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहे. सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व मतदार संघाचा समावेश आहे. यापैकी नाशिक पूर्व मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना मोठे मताधिक्य मिळून त्यांना आघाडी मिळेल, अशी माहिती नांदूर – मानूर सोसायटीचे माजी चेअरमन संतोष माळोदे यांनी दिली.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मागील दोन निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांना आघाडी मिळालेली आहे.खासदार गोडसे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहे. त्यांना नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून मागील दोन निवडणुकीप्रमाणेच आघाडी मिळणार आहे. यासाठी महायुतीचे सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते यांनी एक दिलाने काम केले आहे. त्याचा परिणाम म्हणून गोडसे यांना निश्चितपणे मोठ्या मताधिक्यांची आघाडी मिळेल, असा विश्वास वाटतो. खासदार गोडसे यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने संपर्क ठेवलेला आहे. सर्वांच्या सुखदुःखात ते सहभागी होत असतात. तसेच मतदारांच्या अडचणीला मदत करीत असल्याचा त्यांचा नावलौकिक आहे. गरजू, पिडीत आणि त्रस्त नागरिकांचा लोकनेता अशी त्यांची प्रतिमा असून यामुळे त्यांना निश्चितपणे आघाडी मिळणार आहे. आमचे नेते उद्धव निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर – मानूर परिसरातून आम्ही हजारोंच्या संख्येने खासदार हेमंत गोडसे यांना आघाडी मिळवून देऊ, असा विश्वास नांदूर – मानूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन संतोष माळोदे यांनी व्यक्त केला.