26.6 C
Nashik
Tuesday, June 23, 2026
spot_img

साधना एज्युकेशन इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल ; साईराज पुरकर ९५.६० टक्के गुण मिळवत प्रथम

385 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज एकलहरे शाळेचा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाला लागला. शाळेने दरवर्षीप्रमाणे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन, पालक शिक्षक संघ आणि स्थानिक नागरिकांनी अभिनंदन केले. ९५.६० टक्के गुण मिळवत कु.साईराज अनिल पुरकर शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘एसएससी’ परीक्षेच्या निकालात यशाचा गुलाल उधळला. एकलहरे रोड परिसरातील या विद्यालयाने सलग आपली शंभर टक्के निकालाची ‘सुवर्ण परंपरा’ कायम ठेवत गुणवत्तेची मोहोर उमटवली. पंधरा विद्यार्थ्यांनी सुवर्ण अक्षरात ‘विशेष प्राविण्या’ ची म्हणजेच ‘डिस्टिंक्शन’ची नोंद केली, तर २६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली.विद्यार्थ्यांच्या या ‘घवघवीत’ यशाने पालक वर्गात आनंदाचे वातावरण दिसून आले. शाळेतील साईराज अनिल पूरकर या विद्यार्थ्याने ९५.६०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला.

घवघवीत यश प्राप्त करण्यात शिक्षकांचा पाठिंबा आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत महत्वाची ठरली.असा विश्वास संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी विशाल गाडेकर,सचिव जयश्री योगेश गाडेकर यांनी व्यक्त केला. संस्थेचे विश्वस्त योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर व विशाल सत्यभामा लक्ष्मण गाडेकर आदींनी यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले. मुख्याध्यापिका सरला खैरनार,अंजली घोलप तसेच सर्व शिक्षक वृंदाचे यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. दरम्यान शाळेला मिळालेल्या यशामुळे साधना एज्युकेशन चा यशाचा आलेख यानिमित्ताने उंचावल्याचा दिसतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles