38.9 C
Nashik
Saturday, May 9, 2026
spot_img

रेडक्रॉस म्हणजे सेवाभावाचे प्रतीक ; डॉ. सतीश शिंपी यांचे प्रतिपादन

23 Post Views

 

पोस्टरस्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

नाशिक रोड : उमेश देशमुख

“ सैनिकांवर निरपेक्ष वृत्तीने उपचार करण्याच्या हेतूने सर हेन्री ड्यूनांट यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या लहानश्या झऱ्याचे आज मानवतारूपी महासागरात रूपांतर झाले आहे. देशोदेशींच्या हजारो शाखा आणि स्वयंसेवकांनी अद्वितिय असे प्रचंड काम उभे केले आहे. येत्या कुंभमेळ्यातदेखील नाशिकची रेडक्रॉस प्रथमोपचार आणि आपत्ती व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावेल असा मला विश्वास आहे,”
असे प्रतिपादन नाशिक चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी केले.

जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी , नाशिक जिल्हा  शाखेने आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेडक्रॉस चेअरमन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी होते. व्यासपीठावर रेडक्रॉस सचिव डॉ. सुनील औंधकर , खजिनदार डॉ. प्रशांत भुतडा , व्हाईस चेअरमन डॉ.चंद्रशेखर नामपुरकर, उपक्रम समन्वयक डॉ. प्रतिभा औंधकर, कार्यकारिणी सदस्य आनंद भट्टड , संजय गिते , डॉ. अनिर्बान बंडोपाध्याय उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात रेड क्रॉस चे संस्थापक सर हेन्री ड्यूनांट यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकात डॉ. सुनील औंधकर यांनी सन्माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रणित टीबी मुक्त भारत अभियानाची आणि त्या अनुषंगाने नाशिक रेडक्रॉस घेत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि भारतातील ७०० हून अधिक जिल्हा शाखा करत असलेल्या मानवतावादी कार्याचा गोषवारा सादर केला.

यानंतर नाशिक रेडक्रॉस ने महाराष्ट्र राज्य शाखा आणि अँटी टीबी असोसिएशन यांच्या सहकार्यातून घेतलेल्या राज्यस्तरीय क्षयरोग टीबी पोस्टर स्पर्धेचे पारितोषिक वितरण व्यासपीठावरील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रभरातून दीडशेहून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या पाच पारितोषिक विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक प्रदान करण्यात आले. यात अनुक्रमे श्वेता गणकुरे, ओंकार खराडे (पुणे), डॉ. सिमरन कौर अमरजित सिंग दर्दी, विशाखा आहेर, आकांक्षा कुलकर्णी यांचा समावेश होता . इतर ३० स्पर्धकांना उत्तेजनार्थ पदके देवून गौरविण्यात आले. शालेय स्तरावर विशेष उपक्रम घेवून स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या ना. ए.सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल ला विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धकांच्या वतीने डॉ. सौरभचंद्र पवार आणि खुशी मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अनिर्बान बंडोपाध्याय , प्राचार्य संजय साबळे , डॉ. मिलिंद कुलकर्णी (सिंधुदुर्ग) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती पाटील यांनी केले . प्रमुख अतिथी आणि पोस्टर स्पर्धा परीक्षकांचा परिचय डॉ. मेघा निर्मल , डॉ. सुनंदा भोकरे , डॉ. तेजू सॉलोमन यांनी करून दिला. . पारितोषिक वितरणाचे संचालन आर्या पाटील व डॉ. सुजाता धारणकर यांनी केले तर डॉ. प्रशांत भुतडा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत गोसावी, मंदार कोळेकर ,जयश्री कुलथे, सारिका गुप्ते आदींनी विशेष प्रयत्न केले.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles