कडाक्याच्या थंडीत एक हजार विद्यार्थ्यांना मिळणार उबदार स्वेटर ! ; आमदार ॲड.राहुल ढिकले यांच्या हस्ते होणार वाटप ; माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांचा उपक्रम
ऐन कडाक्याच्या थंडीत जेलरोड परिसरातील एक हजार शालेय विद्यार्थ्यांना मोफत उबदार स्वेटर मिळणार आहे. पंचक येथील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सोमवारी ( दि.१५ ) सायंकाळी चार वाजता मनपा शाळा क्रमांक ४९ येथे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या पुढाकाराने आणि आमदार ॲड राहुल ढिकले यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत स्वेटर वाटपाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
सद्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. थंडीपासून बचाव करण्याची सर्वांनाच उबदार स्वेटरची आवश्यकता आहे. महापालिकेच्या शाळेतील अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने स्वेटर विकत घेऊ शकत नाही.अश्या विद्यार्थ्यांना स्वेटर मिळणार असल्याने ऐन कडाक्याच्या थंडीत उबदार स्वेटर मिळणार आहे.यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचा थंडीपासून बचाव होईल. माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या संकल्पनेतून मोफत स्वेटर वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. माजी नगरसेवक विशाल संगमनेरे सतत समाजहिताचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी दत्त जयंती निमित्ताने भव्य श्रींची मिरवणूक आणि मोफत महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्याची प्रभाग १८ मध्ये सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक हजार शालेय गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटपाच्या कार्यक्रमाची चर्चा प्रभागात सुरू झाली आहे. माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या मोफत स्वेटर वाटप कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सामान्य जनता निश्चित दखल घेणार !
माजी नगरसेवक विशाल संगमनेरे मागील आठ वर्षापासून जेलरोडच्या राजकारण आणि समाजकारणात सक्रीय आहे.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध समाज उपयोगी कार्यक्रम, उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यक्रम आणि उपक्रमाची दखल प्रभाग १८ मधील सामान्य जनता निशिचित घेतील. असा विश्वास संगमनेरे यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.