1,725 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेवर अंतिम शिक्कामोर्तब झाला आहे.यामुळे बहुतांश प्रभागातील राजकीय चित्र स्पष्ट होतांना दिसून येत आहे. येथील प्रभाग १७ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यास काका आणि पुतणे इच्छूक आहे. दोघांनीही उमेदवारीसाठी भाजपकडे दावा ठोकला आहे. काकांची स्थानिक पातळीवर घट्ट पकड तर पुतण्याची दिल्ली दरबारात बड्या नेत्यांसोबत सतत उठबैस अशी दोघांची वैशिष्टे आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी काका पुतण्यावर भारी पडणार की पुतणे काकांवर वरचढ ठरतात. यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

प्रभाग १७ मध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, इतर मागासवर्ग महिला असे आरक्षण आहे. सर्वसाधारण प्रवर्गात भाजपचे माजी नगरसेवक दिनकर आढाव आणि राजेश आढाव भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. दिनकर आढाव यांची राजकीय वाटचाल भरीव वाटते.दसक गाव सरपंच ते नाशिक सहकारी साखर कारखाना चेअरमन पद त्यांनी भूषविलेले आहे.२०१२ मधील महानगर पालिकेतील निवडणुकीचा अपवाद वगळला तर दिनकर आढाव सातत्याने नाशिक महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे.शैलेश ढगे यांनी केलेला पराभव हा केवळ एकमेव अपवाद आहे.
दरम्यान यावेळेला भाजपची उमेदवारी मिळविण्यापासून दिनकर आढाव यांना संघर्ष करावा लागू शकतो.असे बोलले जात आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांना त्यांचे पुतणे राजेश आढाव यांचा एकमेव अडसर ठरू शकतो. राजेश आढाव देखील भाजप कडून उमेदवारी मिळावी.यासाठी प्रयत्नशील आहे. पूर्वाश्रमी पासूनच ते भाजप आणि संघ परिवाराच्या निगडित विविध संस्थांच्या संपर्कातून समाजात सक्रीय आहे.विद्यार्थी परिषद, वंदे मातरम आणि अश्वमेध प्रबोधिनी आदी संस्थाचा प्रामुख्याने समावेश आहे. जननिधी या संस्थेवर देखील कार्यरत आहे.थोडक्यात त्यांनी स्वकर्तुत्वातून सामाजिक वारसा निर्माण केलेला आहे.विविध उपक्रम, कार्यक्रम त्यांनी आमदार राहुल ढिकले आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रभागात राबविलेले दिसतात. सतत दिल्ली दौरा,वरिष्ठ भाजप नेत्यांसोबत संपर्क असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी ते वरिष्ठ पातळीवरून दबाव निर्माण करण्यात यशस्वी ठरतात का?. यासाठी काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल.



