30.5 C
Nashik
Monday, March 23, 2026
spot_img

नाशिकरोडला आंबेडकरी अनुयायांचा जनआक्रोश मोर्चा

134 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

बिहार येथील महाबोधी महाविहार बौध्द धर्मियांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी बुधवारी ( दि.१७ ) नाशिक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जनआक्रोश मोर्चा  काढण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेतर्फे विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की, बिहारमधील बुद्धगया महाबोधी महाविहार बौध्द धर्मियांच्या ताब्यात मिळावे, बीटीए कायदा रद्द करावा, महु भीम जन्मभूमी स्मारक व नागपूर दिक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त करून त्याचे व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभेकडे द्यावे.या मोर्चाला बौध्दगयातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते व बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाची पार्श्वभूमी होती. बौद्ध महासभेच्या महिला विभाग जिल्हाध्यक्ष सुरेखा लोखंडे, भाऊसाहेब जाधव, सरचिटणीस शरद भोगे, भन्ते सुमेध बोधी, सविता पवार, रितेश गांगुर्डे, कृष्णाजी सोनवणे, मनोज मोरे, चेतन गांगुर्डे, मीना साळवे, उर्मिला गायकवाड, कमल लोखंडे, वंदना निकम, सुहास पवार, प्रवीण बागुल, चावदास भालेराव, रत्नाकर साळवे, लीना खरे, कविता बोर्डे, रेखा दिवे, माधुरी निकम, जयश्री गांगुर्डे, चंद्रकला गांगुर्डे, बाळासाहेब शिंदे, दिपचंद दोंदे, राजू जगताप, विजय गांगुर्डे, प्रकाश जगताप, विश्वनाथ भालेराव, प्रभाकर कांबळे, रवी पगारे, प्रल्हाद उघडे, रवी भालेराव, नंदू जाधव आदींसह बौद्ध महासभा भिक्खू संघ, समता सैनिक दल आणि आंबेडकरी बहुजन समाज समविचारी संस्थेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक शिक्षिका सर्व समता सैनिक दल, राजकीय पक्ष, विविध संस्थांचे प्रतिनिधी, उपासक उपासिका मोठ्या संख्येने जन आक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles