परिसरातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे कार्याध्यक्ष सुनील सोनवणे यांची मराठा सेवा संघाच्या नाशिकरोड अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. महाराष्ट्र मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि मराठा सेवा संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष नितीन सुगंधी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सुनील सोनवणे यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत केले जाते आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवा संघ नाशिकरोड शाखा अधिक सक्षम व परिणामकारकपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.याप्रसंगी स्थानिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. समाजातील विविध क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी निश्चितच भक्कम पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न करू, असे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील सोनवणे यांनी म्हटले.