23.4 C
Nashik
Monday, June 29, 2026
spot_img

अहो, कोणी लाईट बिल देता का लाईट बिल ? 

111 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख 

आडगाव महावितरण केंद्राच्या अंतर्गत येणारे वीज ग्राहक समस्यांच्या गर्तेत अडकलेले दिसून येत आहे. येथील जत्रा हॉटेल,आडगाव, कोणार्क नगर,श्रीराम नगर, आदी भागांमध्ये महावितरणच्या ग्राहकांना लाईट बिले घरपोच वाटप केली जात नाही, तसेच सतत सुरू असणारा विजेचा लपंडाव,यामुळे वीज ग्राहकांच्या भावना संतप्त दिसतात. याप्रश्नी आडगाव केंद्राच्या संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका मौनी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहो कोणी लाईट बिल देता का लाईट बिल ? अशी वेळ वीजग्राहकांना ओढवलेली दिसते.

कोणार्क नगर १ व २, श्रीराम नगर, शिवकृपा स्वीट परिसर, बालाजी चौक,ठोंबरे वस्ती, स्वामी समर्थ नगर, जत्रा चौक परिसर,आडगाव, मेडिकल कॉलेज परिसर,जकात नाका, विंचूर गवळी, आदी भागातील वीज ग्राहकांना लाईट वेळेत उपलब्ध करून जात नाही. काही भागात तर लाईट बिल वाटपच केली जात नाही.त्यामुळे लाईट बिल भरण्यासाठी विलंब होतो. वीज ग्राहक आणि महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा वाद होतो तर काही वेळेला वीज पुरवठा खंडित केल्यानंतर वीज वीज ग्राहकांच्या लक्षात येते की आपल्याला लाईट बिलच मिळालेले नाही. 

ऑनलाईन बिल आणि ग्राहक 

महावितरण तर्फे मोबाईलवर लाईट बिलाची पीडीएफ काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे बरेच ग्राहक ऑनलाईन लाईट बिल पीडीएफ काढून ऑनलाईन भरतात. परंतु काही वीज ग्राहकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, किंवा त्यांचा मोबाईल महावितरण कडे रजिस्टर झालेला नाही,त्यामुळे त्यांना ऑनलाइन बिल कसे काढावे हे समजत नाही, पर्यायने बिल भरणा करता येत नाही. अशा ग्राहकांना लाईट बिल वेळेवर मिळाले नाही तर त्यांची मोठी गैरसोय होते. वेळेप्रसंगी विद्युत पुरवठा खंडित देखील होतो.त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला लाईट बिल घरपोच आणि वेळेवर उपलब्ध करून द्यावे,अशी रास्त मागणी त्रस्त वीजग्राहकांची आहे.

विजेच्या लपंडावाणे ग्राहक त्रस्त 

जत्रा हॉटेल परिसर,श्रीरामनगर, कोणार्क नगर या भागात दिवसभरात अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे वीज ग्राहक कमालीचे त्रस्त दिसतात. तक्रारीचा उपयोग होत नाही, त्याकडे दुर्लक्ष होते.आडगाव केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार वीज पुरवठा खंडित होणाऱ्या वीजग्राहकांच्या समस्यांकडे लक्ष पुरविणे अपेक्षित आहे. तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles