20.3 C
Nashik
Wednesday, February 4, 2026
spot_img

युनेस्कोच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा गड किल्ल्याचा समावेश केल्याच्या निर्णयाचे स्वागत

401 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

जागतिक स्तरावर कार्यरत असणाऱ्या युनेस्कोने आपल्या सन २०२४ -२५ च्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित असलेल्या बारा गड किल्ल्याचा समावेश केला आहे. त्यामुळे एकाप्रकारे शिववारशाला जगाने मुजरा केला आहे. या निर्णयाचे स्वागत भारतीय नाशिक शहर भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राजेश आढाव आणि नांदूर मानूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा संजीवनी लॉन्सचे संचालक संतोष माळोदे यांनी केले आहे.

भारत सरकारने भारतातील मराठा साम्राज्यातील किल्ले या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याची संबंधित किल्ल्यांची शिफारस केली होती. महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड,खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग,पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या ११ किल्ल्यांबरोबरच तमिळनाडूतील जिंजी अशा मराठा साम्राज्यातील १२ किल्ल्यांची शिफारस युनेस्कोकडे केली होती. त्यानंतर युनेस्कोच्या समितीकरणा समिती समोर सादरीकर केले होते. त्यात गड किल्ल्यांचा ऐतिहासिक , जागतिक वारसा असल्याचे भारत सरकारने पटवून दिले. परिणामी युनेस्कोने यादीत या किल्ल्यांचा समावेश केला आहे.

मराठ्यांच्या स्वराज्याचे प्रतीक : संतोष माळोदे

नांदूर मानूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा संजीवनी लॉन्सचे संचालक संतोष माळोदे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याची पायाभरणी या किल्ल्यांवर झाली. हे किल्ले केवळ लष्करी केंद्र नव्हते, तर मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नांचे प्रतीक होते. प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक कथा आहे. रायगडावरील शिवराज्याभिषेक, प्रतापगडावरील अफझलखानाचा पराभव, किंवा शिवनेरीवरील शिवरायांचा जन्म. या किल्ल्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व युनेस्कोच्या निकष युनेस्कोने पात्र ठरविल्याच्या निर्णयाचे मनपूर्वक स्वागत करून आभार मानतो.

आंतरराष्ट्रीय मान्यता आणि संवर्धन : राजेश आढाव

भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर उपाध्यक्ष राजेश आढाव म्हणाले की, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने या किल्ल्यांचे संवर्धन, जतन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळेल. युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या किल्ल्यांचे संरक्षण आणि देखभाल यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल. अफगाणिस्तानातील बामियान खोऱ्यातील बुद्धमूर्तीच्या पुनर्स्थापनासाठी युनेस्कोने ४ दशलक्ष डॉलर्सहून अधिक निधी दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भारत सरकारने युनेस्को कडे या १२ गडकिल्ल्यांची शिफारस केल्याने मंत्रीमंडळ व अधिकारी वर्गाचे देखील मनःपूर्वक आभार मानतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles