19.1 C
Nashik
Wednesday, February 4, 2026
spot_img

बिटको शाळेत “एक पेड,माँ के नाम”उपक्रम

214 Post Views

नाशिकरोड : प्रतिनिधी

येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जेडीसी बिटको इंग्लिश हायस्कुलमध्ये शाळेतील हरित सेना आणि एअर विंग एनसीसीतर्फे “एक पेड, माँ के नाम” उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापक दावल नंदन, पर्यवेक्षक त्रिभुवन, सामाजिक वनीकरणचे वनपाल सोनाली देशमुख, हरित सेना विभाग प्रमुख रोहिणी बटवाल, एनसीसी अधिकारी देवेंद्र यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले.

एनसीसीचे छात्र आणि त्यांच्या पालकांनी शाळेतील मोकळ्या जागी विविध फुलांची रोपे लावली. विद्यार्थी आणि त्यांची आई यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा हा नवीन व आगळा प्रयोग शाळेत प्रथमच राबविण्यात आला. विदयार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. मुख्याध्यापक दावल नंदन यांनी पालकांचे अभिनंदन करत मुलांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व सांगितले. शिक्षक व शिक्षकेतरांनी उपक्रमात सहभाग घेतला. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles