272 Post Views
नाशिक रोड : उमेश देशमुख
मालेगाव महापालिकेचे बीट मुकादम अजय चांगरे यांना मारहाण केल्या प्रकरणी माजी नगरसेवक अब्दुल माजिद मोहमंद युनूस यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाने केली आहे. या संदर्भात नाशिक रोड येथे विभागीय आयुक्तांना राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढकोलिया, प्रदेश अध्यक्ष राजेंद्र बागडे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र महरोलिया यांच्याहस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला मंचाच्या चित्रा सोनू, कार्याध्यक्ष बंटी सौदे, महानगर अध्यक्ष राहुल चतुले, बरौनी लावरी, तुषार ढकोलिया, राकेश बहनवाल, संजय राठोर, नितेश राठोर, आनंद राठोर, निखिल पारचे, संजय भरवार, रामू बवंडर, दीपक बेद, मोहित बेद, विकास मेहरोलिया आदी उपस्थित होते. अजय चांगरे महापालिकेचे कर्तव्य बजावत असताना युनूस यांनी शासकीय कामात अडथळा आणून त्यांना मारहाण केल्याची माहिती वाल्मिकी नवयुवक संघाने दिली आहे. या मारहाणीची संघाने तीव्र निषेध केला आहे.