येथील भगूर ते पांढूर्ली रस्त्याची अतिशय बिकट झालेली आहे. जागोजागी मोठे खड्डे पडलेले दिसतात. वाहनधारकांना रस्त्यावरून येणे -जाणे देखील जीवघेणे ठरत आहे. त्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त शेतकऱ्यांनी राहुरी फाटा येथे सोमवारी ( दि.३० ) सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. खासदार राजाभाऊ वाजे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढली. याप्रश्नी लवकरात लवकर रस्ताचे काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मागील काही दिवसांपासून भगूर-पांढूर्ली रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असल्याने प्रशासनाने स्थानिक शेतकरी वर्गांना आंदोलन करणे भाग पाडले. याप्रश्नी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना वारंवार सूचना, निवेदने देऊन देखील रस्त्याच्या कामाकडे अधिकारी वर्ग आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत होते. रस्त्याच्या संदर्भात स्थानिक शेतकरी वर्गास सतत आश्वासन देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कृती शुन्य होती. यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड संतप्त झाला. आणि रस्त्यावर उतरला. सोमवारी रास्ता रोको आंदोलन छेडले. त्याला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.आंदोलनाची दखल तातडीने नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी घेतली. आंदोलन स्थळी भेट दिली. आंदोलकांसोबत चर्चा केली. रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, असे ठोस आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या गावांना रस्ता महत्वाचा
भगूर ते पांढूर्ली रस्ता दहा ते बारा गावाना जोडणारा महत्वाचा रस्ता मानला जातो. राहुरी, दोनवाडे, पांढुर्ली ,विंचुरदळवी,शिवडे , बोरखिंड, शेणीत,बेलू,आगसखिंड,घोरवाड आदी गावातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा रस्ता आहे.
यांचा होता सहभाग
आंदोलन प्रसंगी प्रविण पाळदे, त्र्यंबक शिरोळे, करण ठुबे, आत्माराम बोराडे, शाम शिरोळे,गोरख शिरोळे, बाबुराव मोजाड, रामचंद्र सांगळे, विश्राम शेळके, भाऊसाहेब दळवी, बाळासाहेब पानसरे, लक्ष्म भोर, शिवाजी घोरपडे, शाम दळवी, विकास पानसरे,प्रल्हाद गुघे,गोरख वाघ,शाम घुगे, अरुण आव्हाड, किसन घुगे,करण घुगे आदी उपस्थित होते.