नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी सोमवारी ( दि.१३ ) सायंकाळी सहा वाजता जेलरोडच्या इंदिरा गांधी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्याचे अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रोशन आढाव यांनी केले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते प्रयत्नशील आहे.बानगुडे पाटील यांची सभा यशस्वी करण्यासाठी सभेचे निमंत्रण घरोघरी दिले जात आहे. राष्ट्रीय काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी देखील सभेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहे.