महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सोमवारी ( दि.१३ ) सकाळी सात वाजता आयएसपी प्रेस कामगारांसोबत संवाद साधला. यावेळी प्रेस कामगार यांच्या सोबत झालेल्या चर्चेत केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण, कामगार कपात, रिक्त पदांची रखडलेली कामगार भरती, प्रेसचे आधुनिकीकरण करणे, प्रेस कामगारांना जादा काम देणे, पुक्टो करन्सी म्हणजेच आभासी चलन आणि त्याचे दुष्परिणाम आदी. विविध विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, रामभाऊ जगताप, प्रशांत दिवे, रोशन आढाव, कुलदीप आढाव, कन्नू ताजने ,भैया मणियार आदी उपस्थित होते.
“जास्तीत जास्त मताधिक्य देऊ” : जगदीश गोडसे, प्रेस कामगार नेते
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रेस कामगार निश्चितपणे वाजे यांच्या पाठीमागे राहतील, याची खात्री आहे.