251 Post Views
रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी आपला वाढदिवस कुटुंबासोबत केक कापून साजरा केला. सासरे एकनाथ खडसे आणि सासुबाई मंदा खडसे यांनी रक्षा खडसे यांना केक भरवला. रक्षा खडसे यांचे औक्षण करण्यात आले. वाढदिवसाचा घरगुती कौटुंबिक छोटासा कार्यक्रम झाल्यावर रक्षा खडसे मतदानासाठी घराबाहेर निघाल्या. मतदान केंद्रावर पोहचून त्यांनी मतदान केले.



