443 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून विद्यमान आमदार अँड राहुल ढिकले यांनी दसक पंचक गाव व परिसरात विकास कामे केली आहेत त्यामुळे आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्यांची आघाडी मिळवून देणार आहे. अशी माहिती पंचक गावातील ज्येष्ठ नागरिक शंकर बोराडे यांनी दिली.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले निवडणूक रिंगणात आहे. आमदार ढिकले यांनी मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात दसक पंचक तसेच जेलरोड परिसरात विविध ठिकाणी नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामे केली. सामान्य जनतेच्या संपर्कात आमदार ढिकले कायम असतात. आपण एखादी समस्या घेऊन गेलो की त्यावर ते योग्य तो मार्ग काढतात. नागरिकांच्या समस्येचे समाधान करतात. आमदारकीचा बडेजाव ढिकले यांनी त्यांच्या कार्यकाळात केला नाही, हे ढिकले यांचे खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अगदी सामान्य राहणीमान आणि उच्च विचार हे त्यांचे गुण सामान्य मतदारांना त्यांच्या बाजूने मतदान करण्यास भाग पाडतील.असा विश्वास शंकर बोराडे यांनी व्यक्त केला.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय