24.2 C
Nashik
Wednesday, July 2, 2025
spot_img

तीस वर्षात रखडलेली विकास कामे पाच वर्षात!; आमदार मॅडम पुन्हा येणारच!; माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले

708 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

रामशेज रस्ता मागील तीस वर्षापासून रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता. शाळेतील लहान मुलांना नाल्यातून ,गुडघ्या एवढ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. जीवावर उदार होऊन लहान मुले शाळेत ये – जा करीत होती, पण तत्कालीन लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाने या जीवघेण्या समस्येची कधी दखल घेतली नाही. आमदार सरोज अहिरे यांनी तत्काळ दखल घेतली. शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुखकर केला. सिद्ध पिंप्री व पळसे गटातील तीस वर्षापासूनची रखडलेली कामे केवळ पाच वर्षात मार्गी लागली.त्यामुळेच आमदार सरोज अहिरे पुन्हा विजय होतील, असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले यांनी व्यक्त केला.

सिद्ध पिंप्री गावात जय बाबा कुटिया परिसरा सभा मंडपाचे काम करून दिले. सभामंडपाचा उपयोग गोरगरीब जनता विवाह समारंभासाठी करते, दशक्रिया विधी आदी छोटे मोठे कार्यक्रम येथे पार पडतात. गरजू जनतेची पैशाची बचत होते. शासनाने येथील १०० ते १५० एकर जागा लष्कराच्या ट्रेनिंग सेंटर साठी दिली. संबंधितांनी सदर जागेला कुंपण केले. त्यामुळे वाल्मीक नगर परिसरातील अमरधाम कुंपणामध्ये गेले.अंत्यविधीसाठी नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. तत्काळ दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता,याविषयी आमदार सरोज अहिरे यांनी त्वरीत दखल घेतली.वाल्मीक नगर येथे नव्याने अमरधाम बांधून दिले. खंडेराव माथा रस्ता, सिध्द पिंप्री ते ओझर रस्ता विकसित करावा, अशी मागणी गेल्या ३० वर्षापासूनची होती. परंतु आजवर त्या मागणीकडे दुर्लक्ष झाले, केवळ आश्वासने मिळाली, ठोस काम झाले नाही, आमदार सरोज अहिरे यांनी या समस्येची दखल घेऊ केवळ अडीच वर्षात तीस वर्षापासून रखडलेली मागणी पूर्ण केली. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा त्यांनी विश्वास संपादन केला. त्याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत अहिरे यांना आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजयी करून दाखविणार आहोत, असे माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंतराव ढिकले यांनी म्हटले

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय


.
तालुक्यातील ८० गावात विकासकामे : ढिकले

नाशिक तालुक्यातील जवळपास ८० गावांमध्ये आमदार सरोज अहिरे यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली. त्यामुळे ज्या गावात विकास कामे झाली, त्या गावातील नागरिक समाधानी आहेत,विकास कामे झाल्यामुळे नागरिक निश्चितपणे आमदार सरोज अहिरे यांच्या पाठीमागे उभे राहतील, त्यांच्या बाजूने आपला कौल देतील, असे माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles