देवळाली विधानसभा मतदार संघातील मतदार विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना दुसऱ्यांदा निश्चितपणे विधानसभेत मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवतील, यात शंका नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे पाच वर्षात आमदार अहिरे यांनी केलेला मतदार संघाचा विकास आहे. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे युवा नेते विक्रम कोठुळे यांनी केला आहे.
विक्रम कोठुळे यांनी सांगितले की, आमदार सरोज अहिरे यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आपले राजकीय सामर्थ्य निर्माण केले. देवळाली विधानसभा मतदारसंघात विविध समस्या अडचणी होत्या. काही समस्या तर वर्षानुवर्ष जैसे थे अवस्थेत होत्या. त्या सोडविण्यासाठी आजवर कोणीही प्रामाणिक प्रयत्न केले नाही. परंतु आमदार अहिरे यांनी जातीने लक्ष घालून प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यावर भर दिला. बालाजी देवस्थान त्यापैकी एक उत्तम उदाहरण आहे. विहितगाव तसेच पंचक्रोशीतील काही शेतकऱ्यांनी आमदार अहिरे यांना याप्रश्नी मदत केली. अहिरे यांनी देखील तितक्याच पोट तिडकेने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून वर्षानुवर्ष रेंगाळलेली शेतकऱ्यांची कामे मार्गी लागली.आज शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील बालाजी देवस्थानचे नाव संपुष्टात आले. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याचे श्रेय खऱ्या अर्थाने आमदार सरोज अहिरे यांनाच दिले पाहिजे, असे माझे मत आहे.
नांदूर नाका परिसरात विवाह समारंभासाठी सुसज्ज संजीवनी बँक्वेट हॉल मंगल कार्यालय
दुसऱ्यांदा संधी मिळेल
देवळाली विधानसभा मतदारसंघात झालेली विकास कामे ही अहिरे यांची जमिनीची बाजू आहे. मतदार संघातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांची वस्तीवर, खेड्यापाड्यात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहिरे यांनी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न केले. त्याची प्रचिती म्हणजे विकास मतदारसंघात झालेली विकास कामे आहे. असे विक्रम कोठुळे यांनी सांगितले.