बांधकाम व्यावसायिक उदय सांगळे यांना अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश मिळाला. मंगळवारी ( दि. २२ ) रोजी मुंबई येथे प्रवेश पार झाला. त्यामुळे उदय सांगळे सिन्नर विधानसभा मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार होतील. हे जवळपास निश्चित झाले आहे. लवकरच त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
मागील अनेक दिवसापासून उदय सांगळे यांचा प्रवेश रखडला होता. त्यांना प्रवेश देऊ नये, असा एक मोठा वर्ग सिन्नर तालुक्यात होता. सांगळे यांना प्रवेश दिला जाणार की नाही, याविषयी उत्सुकता होती. सांगळे यांच्या दृष्टीने हा प्रतिष्ठेचा विषय झाला. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा प्रवेशाला विरोध असल्याची चर्चा सिन्नर तालुक्यामध्ये केली जात आहे. मंगळवारी झालेल्या प्रवेशामुळे सांगळे यांचा सिन्नर विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला. सांगळे यांचा प्रवेश होताच त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोकाटे अन् सांगळे आमने – सामने
सांगळे यांच्या प्रवेशामुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघातील चित्र जवळपास स्पष्ट झाले. अजित दादा पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले उदय सांगळे यांच्यामध्ये सरळ लढत होईल. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राजकीय जाणकारांचे या प्रवेश याकडे लक्ष लागून होते.