22.9 C
Nashik
Tuesday, July 1, 2025
spot_img

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राध्यापकांना उपयुक्तता सिध्द करावी लागणार

374 Post Views

मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे यांचे प्रतिपादन

देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाते आहे. शिक्षणातील साचलेपणा यामुळे दूर होईल. जुन्या ऐवजी आता नविन पध्दतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. प्राध्यापकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदलाचा अभ्यास करुन त्यांना स्वताची उपयुक्तता सिध्द करावी लागेल, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले.देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात सोमवारी (दि.६] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय यांच्या सयुंक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० अंमलबजावणी निमित्ताने आयोजित विज्ञान विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अॅड. ठाकरे बोलत होते.

व्यासपीठावर कार्यशाळेचे अध्यक्ष तथा मविप्रचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा पिंगळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील, भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. संजय ढोले, रसायनशास्त्र अभ्यास मंडळ प्रमुख डॉ. बी. एस. जगदाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस. काळे, अधिसभा सदस्य अॅड. बाकेराव बस्ते, अशोक सावंत, प्रा. चिंतामण निगळे, सेवक सदस्य डॉ. संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे पुढे म्हणाले की, आनंददीयी शिक्षण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ठे मानले जाते. मागील अनेक वर्षापासून जुनेच शैक्षणिक धोरण होते.

सन २०२० पासून नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत असलयाने भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल झालेले दिसून येऊ शकतात. त्यामुळे प्राध्यापकांनी याविषयी सर्व कंगोरे समाजावून घेणे आवश्यक असलयाचे ठाकरे यांनी म्हटले. प्रास्ताविक भाषणात प्राचार्य डॉ. एस.एस. काळे यांनी सांगीतले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जागतिक शैक्षणिक प्रणालीप्रमाणे आहे. त्याचा लाभ भारतामधील विद्यार्थ्यांना होईल. जागतिक शैक्षणिक स्पर्धेत बहुशाखीय अभ्यासक्रम म्हणुन भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे बघीतले जात आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब पगार यांनी मांडली. सुत्रसंचालन डॉ. बी.एन. शेळके यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles