22.3 C
Nashik
Tuesday, July 8, 2025
spot_img

उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी दंड्या मारुतीला माजी आमदार घोलप यांचे साकडे ; ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त योगेश गाडेकर यांच्याकडून आरोग्य तपासणी व रेनकोट वाटप

879 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख 
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे कार्यकारी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने देवळाली गाव येथे मोफत आरोग्य तपासणी तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन योगेश गाडेकर यांनी केले होते. यानिमित्ताने बोलताना माजी आमदार योगेश घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण देवळाली गावातील दंड्या मारुतीला महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांतर्फे साकडे घातल्याचे सांगितले. तसेच आयोजक योगेश गाडेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

विधानसभा समन्वयक योगेश सत्यभामा गाडेकर दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने देवळाली गाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच विविध कार्यक्रम, उपक्रम राबवत असतात. शनिवारी दिनांक २७ रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने देवळाली गावातील दंड्या मारुती येथे नाशिकरोड आणि जेलरोड परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत रेनकोट वाटप करण्यात आले.

जत्रा हॉटेल परिसरातील स्वप्नातील घरांसाठी एकमेव विश्वासपात्र समृद्धी बिल्डकॉम

त्याचप्रमाणे गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी झाली. यावेळी योगेश गाडेकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राला योग्य दिशा देऊ शकतात,महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धमक ही केवळ उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. तसेच आजवर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती गाडेकर यांनी दिली.
याप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप, ज्येष्ठ शिवसैनिक जयंत गाडेकर, माजी नगरसेवक केशव पोरजे,

देवळालीगाव पंच कमिटी सदस्य बाळनाथ मामा सरोदे, श्रावण मामा लांडे, हास्य क्लब अध्यक्ष पाटील सर, नागपुरे , मालपाणी काका, महेश देशमुख, देविदास काका शिरसाट, माजी नगरसेवक भैय्या मनियार, उत्तम कोठुळे, माजी महापौर नयना घोलप, माजी नगरसेविका सुनीताताई कोठुळे, योगेश देशमुख, किरण डहाळे, विकास गीते, योगेश भोर, योगेश शिंदे, स्वप्निल औटे, सागर निकाळे, चंदू महानुभाव, अमोल आल्हाट, शेखर पवार, संजय कोठुळे, गणेश बनकर, प्रमोद शिंदे, आत्माराम आढाव, नितीन हांडोरे, रमेश पाळदे, राहुल चटोले, पंकज सोनवणे, देवळालीगाव महिला शाखाप्रमुख अश्विनी माने, मंदा गवळी, अतुल गवळे, सुनील आण्णा देवकर, सुखदेव लोंढे, रवी गाडेकर, ओम बोबडे, कुणाल शहाणे, संदीप आहेर, हेमंत चौधरी आदींची उपस्थिती होती. विधानसभा समन्वयक तथा कार्यक्रमाचे आयोजक योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, देवळालीगाव शाखाप्रमुख प्रतीक आल्हाट तसेच स्वप्नील वाबळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles