22.3 C
Nashik
Tuesday, July 8, 2025
spot_img

प्रेस मजदूर संघ निवडणूक निकाल ; जगदीश गोडसे आणि ज्ञानेश्वर जुंद्रे यांचा कामगार पॅनल पहिल्या फेरीत आघाडीवर

579 Post Views

नाशिक रोड : उमेश देशमुख
आयएसपी-सीएनपी प्रेस मजदुर संघाच्या ३० जागांसाठी शनिवारी (दि.२०) झालेल्या निवडणूकीची रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या व दुसऱ्या फेरीच्या मतमोजणी नंतर कामगार पॅनलच्या बहुतांश उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आपला पॅनल पिछाडीवर असून रात्री उशिराने मतमोजणीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान वर्क्स कमिटीची मतमोजणी २२ जुलै रोजी होणार आहे.

अध्यक्षपदासाठी जयवंत भोसले हे बिनविरोध निवडून आले आहे. तर उर्वरित जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. कामगार पॅनलच्या उमेदवारांची विमान निशाणी आहे. तर आपला पॅनलच्या उमेदवारांची छत्री निशाणी आहे.मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतरचे जाहीर झालेले निकाल पुढीलप्रमाणे आहेत. सर्वाधिक मते मिळालेले उमेदवार कामगार पॅनलचे तर कमी मते मिळालेली उमेदवार आपला पॅनलचे आहेत.

जत्रा हॉटेल परिसरात स्वप्नातील घरासाठी विश्वासपात्र “समृद्धी बिल्डकॉम”

कार्याध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ज्ञानेश्वर जुंद्रे आणि एच आर डिकले निवडणूक रिंगणात आहे. त्यापैकी पहिल्या फेरीमध्ये जुंद्रे यांना 357 ते ढिकले एच आर यांना 243 मते मिळाली आहे. उपाध्यक्ष पदाच्या चार जागेसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये आहेर जी बी यांना 224, काकड जी बी यांना 200 जगताप आर सी यांना 350 टाकेकर आर डी यांना 390 डांगे के ए यांना 333 पाटोळे के आर यांना 256 बनसोडे पी ए यांना 319 सद्गुरु ए पी यांना 223 मते मिळालेली आहे.
जनरल सेक्रेटरी पदाच्या एका जागेसाठी विद्यमान जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांना पहिल्या फेरीत 415 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार गांगुर्डे के एस यांना 190 मते मिळाली.
जॉइंट सेक्रेटरी पदाच्या निवडणुकीमध्ये कटाळे एच व्ही यांना 404, कदम ए के यांना 397 खेलुकर एस के यांना 212, जगताप आर के यांना 378, देवरुखकर ए जी यांना 352 पगारे आर पी यांना 210 रहाटळ के एम यांना 211 रावले एम एल यांना २४७ शेख इ आर यांना 205 सोनवणे आर ए यांना 196 शहीद बीके यांना 337 हिंगमिरे सीएस यांना 373 मते मिळाली.
खजिनदार पदाच्या एका जागेसाठी पेखळे के एच यांना 349 तर शेळके डी. एच यांना 247 मते मिळाली.


कार्यकारणी सदस्यांच्या पदांसाठी आर के एच यांना 226 कुकडे बी टी यांना 193 केदारे ए जे यांना 05 कोकाटे एम डी यांना 386 खर्जुल के एस यांना 400 गांगुर्डे डी पी यांना 402 गांगुर्डे व्ही बी यांना 382 गुंजाळ एस आर यांना 389 घुगे एस डी यांना 386 चंद्रमोरे एस एच यांना 386 किडे एस डी यांना 383 जाधव आर व्ही यांना 208 जाधव एस इ यांना 381 झगडे यांना 187 तिकोने एस एन यांना 224 तर देवरे एस एन यांना 219 , नागरे एस के यांना 214 पाटणकर डी पी यांना 201 पाटील आर के यांना 207 पाटील एस पी यांना 202 पोरजे एस एस यांना 231 पोटिंदे एस एन यांना 368 बोराडे यांना 390 भालेराव आरडी यांना 187 भालेराव एस एस यांना 338 भावनात व्ही टी यांना 213 माळोदे बी जी यांना 194 वारूगंसे आर वी यांना 369 व्यवहारे एस के यांना 319 शेख आर ए यांना 365 सानप बी एन यांना 357, साळवे डी एम यांना 196 तर हेलाडे आर एम यांना 190 मते मिळाली आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles