जेलरोड येथील विद्यानगरी , ऊर्जा व मनपा सोसायटीला जोडणारा उपरस्ता दगड, काटे टाकून बंद करण्यात आला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट महापालिकेचे अतिक्रमण विभाग गाठले. बंद केलेला उपरस्ता तातडीने सुरू करावा, अश्या मागणीचे निवेदन दिले आहे. त्यामुळे आता मनपाचा अतिक्रमण विभाग नेमका काय कारवाई करणार ?, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून आहे.
निवेदनाचा विषय असा की, विद्या नगरीवासीय आपणास नम्रपणे कळवतो की, विद्या नगरीतुन ऊर्जा सोसायटीकडे जाण्यासाठी ओपन स्पेस जवळ एक उपरस्ता आहे. तेथील प्लॉट धारकाणे उपरस्ता पूर्वी झाडे लावून अरुंद केला, तसेच आता काटे व दगड टाकुन पूर्णपणे बंद केलेला आहे. ऊर्जा सोसायटी तसेस मनपा सोसायटीमध्ये जाण्यासाठी हा उपरस्ता सोयीचा आहे. तसेच कॉलनीमध्ये काही कार्यक्रम असल्यास सद्या बंद केलेला रस्ता नागरिकांना सोयीचा ठरतो. तरी या रस्त्यामध्ये निर्माण केलेला काटे ,दगडांचा अडसर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दूर करून रस्ता मोकळा करून द्यावा, तसेच भविष्यात अतिक्रमण होणार नाही, याविषयी उपाययोजना महापालिका प्रशासनाने करून देऊन बंद केलेला रस्ता रहदारी करिता कायमस्वरूपी मोकळा करून घ्यावा, अशी मागणी महापालिका अतिक्रमण अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर पी.पी.काळे, बी.एन.सोनवणे,अजय मोरे, राजेंद्र इंगळे, भास्कर मुरकुटे, डी. एम. अरुण, शैला जाधव, व्ही. के.गुप्ता, सागर दाते आदींची नावे आहेत.