23 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

प्रेस कामगार संघटनाच्या लढ्यानंतर १६ हजार बोनस ! ;कामगारांकडून फटाके फोडून स्वागत

243 Post Views

नाशिक रोड : उमेश देशमुख

नाशिक रोडच्या आयएसपी-सीएनपी प्रेससह प्रेस महामंडळाच्या देशभरातील नऊ कारखान्यातील कामगारांना देण्यात येणारा दिवाळी बोनस महामंडळाने गेल्या वर्षी नाकारला होता. मात्र, आयएसपी प्रेस मजदूर संघ व अन्य कामगार संघटनांनी आंदोलन केल्याने यंदा दिवाळीसाठी प्रेस महामंडळाने १६ हजाराचा बोनस जाहीर केला आहे. तो कायमच मिळणार आहे. यासाठी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले होते.

बोनस न देण्याची भूमिका नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या मुख्यालयाने घेतली होती. त्यामुळे मागील वर्षी कोणालाच बोनस मिळणार नव्हता. परंतु, मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन बोनस कपातीचे हमीपत्र घेतले होते. त्यानंतर सर्व कामगारांना बोनस मिळवून दिला. बोनसचा (सानुग्रह अनुदान) निर्णय प्रेस महामंडळाने घेण्यासाठी महा मंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापकांना वेळ देण्यात आला होता. आठ महिने झाले, पुढील दिवाळी जवळ आली तरी बोनसबाबत निर्णय होत नव्हता. मजदूर संघासह देशभरातील नऊ कारखान्यातील संघटनांनी बोनससह अन्य प्रश्नी व्यवस्थापनाला संपाची नोटी देत आंदोलन सुरू केले होते.

सहाय्यक कामगार आयुक्त व मुख्य कामगार आयुक्त, कामगार मंत्रालयाच्या सचिवांकडे बैठका घेतल्या. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सचिव अनुराधा ठाकूर यांच्याबरोबर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे यांची बैठक झाली. अनुराधा ठाकूर यांनी निर्देश दिल्याने प्रेस महामंडळाने बोनस देण्यास अनुमती दिली. त्यामुळे मागील वर्षी हमीपत्र देऊन घेतलेला बोनस नियमित करण्याचे आदेश प्रेस महामंडळाने काढले. यामुळे यंदाचा बोनसचा मार्ग सुकुर झाला आहेच, परंतु, या पुढेही बोनस मिळण्याची अडचण कायमची दूर झाल्याचे जगदीश गोडसे यांनी सांगितले.दरम्यान, बोनसच्या वृत्तामुळे दोन्ही प्रेसमध्ये कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला. कामगार नेते रामभाऊ जगताप, प्रवीण बनसोडे, अशोक पेखळे, चंद्रकांत हिंगमिरे, संतोष कट्याळे, नंदू कदम, अविनाश देवरूखकर, बबन सैद, मनोज सोनवणे, बाळासाहेब ढेरिंगे, भूषण मेढे, संपत ढोकणे, अण्णा सोनवणे आदींसह  कामगार उपस्थित होते.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles